IPL 2022 : 5 वेळा पराभूत होऊनही मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा?
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात एक दोन नाही तर तब्बल 5 सामने मुंबई टीम पराभूत झाली आहे. आता तुम्हाला वाटलं असेल की त्यांच्यासाठी प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड आहे. तर तसं नाही अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी मुंबई टीमला आहे. नेमकं समीकरण काय आहे जाणून घेऊया.
सध्या मुंबई टीम पाँईट टेबलवर दहाव्या स्थानावर आहे. 5 पैकी 5 सामने टीम पराभूत झाले आहेत. याशिवाय दोनवेळा स्लो ओव्हरसाठी दंड बसला आहे. त्यामुळे आता टीमला जपून खेळावं लागणार आहे.
2014 मध्ये मुंबई टीमसोबत असाच प्रकार घडला होता. पहिले 5 सामने मुंबईने गमावले होते. मात्र त्यानंतर मुंबईने उर्वरित 9 सामन्यांपैकी 8 सामने दमदारपणे जिंकले आणि प्लेऑफपर्यंत पोहोचली.
साधारण प्ले ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी 16 पाँईट्सची आवश्यकता आहे. आता 5 सामने मुंबई पराभूत झाली आहे. 14 पैकी 9 सामने अजूनही मुंबईकडे आहेत. त्यापैकी 8 सामने कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई टीमला जिंकणं गरजेचं आहे. तसं झालं तरंच प्लेऑफचे दरवाजे खुले होतील. अन्यथा मुंबई प्ले ऑफमधून बाहेर जाईल.
IPL 2022 : 5 वेळा पराभूत होऊनही मुंबईसाठी प्ले ऑफचा मार्ग मोकळा?
