कोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे.
त्यानुसार आज राष्ट्रवादी–जनसुराज्य आघाडीने 41 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 33 उमेदवारांचा तर जनसुराज्य पक्षाच्या 8 उमेदवारांचा समावेश आहे. ही निवडणुक दोन्ही पक्ष ‘घड्याळ’ या चिन्हावर लढविणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शहर जिल्हाध्यक्ष राजेश लाटकर, जनसुराज्य पक्षाचे प्रा.जयंत पाटील, मा.आर.के.पोवार , जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांनी ही यादी जाहीर केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
कोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर
