शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी

नवी दिल्ली : नोएडामध्ये विद्यार्थिनीने शिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहे. एका विद्यार्थिनीची अटेंडन्स ही कमी होती त्यामुळे तिला परीक्षा देता येणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे विद्यार्थिनीने याबाबत शिक्षकाला परीक्षेला बसू द्यावे यासाठी विनंती केली तर शिक्षकाने या बदल्यात मला काय मिळेल अशी विचारणा केली.

एका दुसऱ्या विद्यार्थिनीने ही या शिक्षकावर आरोप केले आहे की, जेव्हा ती शिक्षकाकडे परीक्षेसाठी बसता यावं यासाठी विनंती करण्यासाठी गेली तेव्हा देखील या शिक्षकाने मला यासाठी काय मिळेल अशी विचारणा केली आणि कॅबिन लॉक केली आणि तिच्यावर अत्याचार केले असे आरोप केले आहे.

विद्यार्थिनी ही पहिल्या वर्षाला आहे. याबाबत तिने कॉलेजच्या प्राध्यापकांना तक्रार केली. याबाबत चौकशी सुरु असल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं तर पोलिसांनी तक्रार न मिळाल्याने कारवाई केली नसल्याचं समोर आलंय. विद्यार्थिंनी या घटनेविरोधात कॉलेजमध्ये आंदोलन केलं.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
proffesor sexually abuse to college student
News Source: 
Home Title: 

शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी

शिक्षकाने विद्यार्थिनीकडे केली धक्कादायक मागणी
Yes
No
Section: