श्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.

लष्कराचे जवान आपला जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवतायत हे जग जाहीर आहे. काश्नीरमध्ये पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी आर्मी सर्वात मोठा दुवा ठरतेय. लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर वाचवलेल्या लोकांना माहिती देण्याचाही सपाटा सुरू केला आहे, त्यांचे फोटो आणि आतापर्यंत पुराच्या वेढ्यातून बाहेर काढलेल्या लोकांची नावं देखिल प्रकाशित केली आहेत.

श्रीनगरमध्ये मदत कार्यात गुंतलेल्या एनडीआरएफच्या टीमवर एका छोटासा हल्ला झाला. मात्र यात एक एनडीआरएफचा जवान गंभीर जख्मी झाला. या जवानाला चंदीगडला हलवण्यात आलं आहे, चंदीगडमध्ये या जवानावर उपचार सुरू आहेत.

या घटनेवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कमेटीने चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे आर्मी वेळेवर आली, त्यामुळे आम्ही श्वास घेतोय, अशा स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. पुरग्रस्तांनी खुल्या दिलाने आर्मीचं कौतुक केलं आहे. राजकारण्यांवर त्यांचा मात्र राग दिसून आला आहे. काँग्रेस नेते सैफुद्दीन सोस यांच्याशी काही लोकांनी झटापटही केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Angry locals attack, heckle NDRF jawans during relief operations in Srinagar
News Source: 
Home Title: 

श्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न

श्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न
Yes
No
Section: