महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये

नाशिक : नाशिकमधल्या (Nashik) श्रीरामपूर इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाची हत्या करुन त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) केलं आणि ते नातेवाईकांना पाठवलं. रामनवमीच्या दिवशीच ही घटना घडल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

काय आहे नेमकी घटना?
बलराज दत्तात्रय कुदळे असं आरोपीचं नाव असन तो ट्रकचालक आहे. आरोपी पत्नी अक्षदा आणि पाच वर्षांचा मुलाग शिवतेज यांच्यासह श्रीरामपुरमधल्या दिघी इथं शेतात राहत होता. आरोपी बलराज आणि त्याच्या पत्नीत गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होता. दररोजच्या भांडणाला कंटाळून अक्षदा मुलासह माहेरी निघुन गेली होती. नुकतीच ती माहेरहून सासरी आली होती.

पण आरोपी बलराजच्या डोक्यातला राग शांत झाला नव्हता. रविवारी सकाळी अक्षदा घरात काम करत असताना बलराजने पाठिमागून येत तिच्या डोक्यात कुदळ घातली. हा घाव इतका जबदस्त होता की अक्षदाचा जागीच मृत्यू झाला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही त्याने पोटच्या मुलाला घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने फाशी देऊन ठार केलं.

हत्या केल्याच्या घटनेचं रेकॉर्डिंग
धक्कादायक म्हणजे मुलाचा जीव जाईपर्यंत दहा ते पंधरा मिनिटं तो तिथेच थांबला. या सर्व घटनेचं त्याने आपल्या मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि हा व्हिडिओ कुटुंबिय आणि गावकऱ्यांना पाठवला. चाकण इथल्या मेहुण्याला व्हिडिओ कॉल करुन त्याने पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले. तुझ्या बहिणीला आणि भाच्याला मारुन टाकलं, त्यांच्या मयताला ये असं सांगत आरोपीने कॉल कट केला.

घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त
या घटनेने एकच खळबळ उडाली. अक्षदाचे नातेवाईक आणि ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले त्यांनी आरोपीचं घट पेटवून दिलं. आरोपीला पोलिसांनी अटक  केली असून पुढचा तपास सुरु आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Man ends wife and sons life recorded a video and send it to relatives
News Source: 
Home Title: 

महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये

महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली, व्हिडिओ रेकॉर्डींग पाठवून मेहुण्याला म्हणाला मयताला ये
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
महाराष्ट्र हादरला! पत्नी-मुलाची हत्या केली
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, April 11, 2022 - 10:53
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No