पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसचा सर्वात मोठा खुलासा; घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन

Pune ATS News :  पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसने सर्वात मोठा खुलासा केला आहे. ज्या घरात हे दहशतवादी राहत होते, त्या घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन लिहिलेला कागद सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घराच्या पंख्याच्या पाईपमध्ये एक कागद लपवण्यात आला होता. ज्यात बॉम्ब बनवण्याची सर्व माहिती हाताने लिहिली होती. हा कागद एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

या प्रकरणात पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. अदनान अली सरकार (Dr Adnan Ali Sarkar) असं या डॉक्टरचं नाव आहे. अदनान अली हा भूलतज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. पुण्यातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ज्या  घरामध्ये हे दहशतवादी राहत होते. तेथे तपासादरम्यान अनेक धक्कादायक पुरावे तपास पथकाच्या हाती लागले आहेत.  अॅल्युमिनीयमचे पाईप, काच आणि बुलेट्स देखील सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा पुणे किंवा अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन होता याची कसून चौकशी आता एटीएस करत आहे. 

चांदोली, कामशेत आणि अलिबाग येथे बेस कॅम्प उभारण्याचा प्लान

पुण्यात दहशतवादी कारवाईप्रकरणी आता आणखी एकाला अटक करण्यात आली. पुणे एटीएसने रत्नागिरीतून चौथ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  दहशतवाद्यांना आश्रय देणा-या आरोपीला आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पुण्यात या आधी आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेला संशयित दहशतवादी डॉ. अदनान अलीला अटक करण्यात आली होती. तर पुण्यात पकडलेले दहशतवादी हे अल सफा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादी रतलाम मोड्युल राबवत होते.चांदोली, कामशेत आणि अलिबाग येथे बेस कॅम्प उभारण्याचा यांचा प्लॅन होता अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली.

पुण्यातून आयसिसच्या संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येतायेत. याप्रकरणात पुण्यातून एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. अदनान अली सरकार असं या डॉक्टरचं नाव आहे. अदनान अली हा भूलतज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. मात्र धर्माची भूल देऊन त्यानं अनेक तरूणांना आयसिसच्या नादाला लावल्याचा आरोप होतोय. NIAनं त्याच्याकडून आयसिसशी निगडीत अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. 
अदनाननं 2001 मध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातून MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. 2006 मध्ये त्यानं भूलतज्ज्ञ म्हणून एम.डी. पदवी मिळवली..अॅनेस्थेशिया या विषयात रिसर्च पेपर लिहिले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून अदनान भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता.

पुण्यात बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी याआधीच ATSनं चार जणांना अटक केलीय. तर आता NIAने ताबिश नासिर सिद्दीकी, जुबैर नूर महैम्मद शेख, शरजील शेख आणि जुल्फिकार अली अशी या आरोपींची नावं आहेत. त्यात आता भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली सरकारची भर पडली आहे. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
ATS biggest revelation about terrorists caught in Pune A plan to make a bomb at home
Home Title: 

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसचा सर्वात मोठा खुलासा; घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन  

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसचा सर्वात मोठा खुलासा; घरात बॉम्ब बनवण्याचा प्लॅन
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत ATSचा सर्वात मोठा खुलासा; बॉम्ब बनवण्याचा प्लॅन
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, July 30, 2023 - 15:38
Created By: 
Vanita Kamble
Updated By: 
Vanita Kamble
Published By: 
Vanita Kamble
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
347