कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!

कैलास पुरी, झी मीडिया, पुणे: आळंदी जवळील चऱ्होली बुद्रुकमध्ये मित्राची हत्या करून स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचला गेल्याची धक्कादायक घटना (Shocking News) समोर आली आहे. हा सर्व खटाटोप प्रेयसीसोबत पळून जाण्यासाठी केल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सुभाष थोरवे असं 58 वर्षीय प्रियकराच नाव आहे. रवींद्र घेनंद असं हत्या झालेल्या मित्राच नावं आहे. सुभाषच्या कुटुंबाने त्याचा अपघातात मृत्यू झाला असं समजून दशक्रिया विधी घातला. तर संतोष हा प्रेयसीसोबत जेजुरीत (Jejuri) पळून गेला होता. (Alandi boy attempted to his fake death to run away from his family to live with his girlfriend Pune News Marathi)

स्वतः च्या मृत्यूचा बनाव रचून मित्राची हत्या केल्याची माहिती प्रेयसीला देण्यात आली त्यामुळं घाबरलेली प्रेयसीने घरी जाण्याचा तगादा लावला. सोबत असलेले पैसे संपल्याने तो अत्यंत बिकट अवस्थेत होता. तो चुलत बहिणीकडे पायी जात असताना त्याला चोर समजून तेथील स्थानिक नागरिकांनी मारहाण देखील केली. संतोष थोरवेने स्वतः नाव सांगताच नागरिकांनी चुलत बहिणीला बोलावलं आणि संतोष थोरवेला बघताच बहीण बेशुद्ध पडली. स्थानिकांनी आळंदी पोलिसांना बोलावून संतोषला ताब्यात घेतलं आणि स्वतः चा मृत्यूचा (pune crime story) बनाव केला असल्याचं बिंग फुटलं.

गंभीर घटनांचा सिलसिला सुरूच: 

पुण्याप्रमाणे वडगावही येथेही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वडगाव मावळमध्ये पोलट्री सुरक्षा रक्षकाची हत्या करून पुरावा नष्ट करणाऱ्या तीन जणांना वडगाव न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे. रघुनाथ चंदू वाल्हेकर, कैलास उर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर आणि विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. 2017 मध्ये पोलट्रीमधून जाण्यास विरोध केला होता. या कारणावरून आरोपींनी हरीशचंद्र पांडुरंग वाघमारेची दोरीने गळा आवळून हत्या केली होती. कामशेत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच वर्षानंतर या हत्येचा निकाल लागला असून आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

नाशिकमध्येही एका वॉर्डबॉयकडून (Wardboy) महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. दवाखान्यातील कात्रीने शरीरावर केले सपासप वार केले आहेत. घटनेत डॉक्टरही गंभीर जखमी झाले होते. गंगापूर रोडवरील निम्स रुग्णालयातील रविवारी रात्रीची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही हाती लागला असून यात वॉर्ड बॉय डॉक्टरला पोटात आणि मानेवर वार करताना दिसत आहे. मैत्रिणीला महिला डॉक्टर ओरडत असल्याचा वॉर्ड बॉयच्या मनात राग होता. गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली आहे.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Alandi boy attempted to his fake death to run away from his family to live with his girlfriend Pune News Marathi gh
News Source: 
Home Title: 

कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पिळून गेला!

कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!
Caption: 
alandi news
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
कुटुंबियांनी मुलाचा दशक्रिया विधी केला पण तो मात्र प्रेयसीसोबत पळून गेला!
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, December 28, 2022 - 14:59
Request Count: 
1
Is Breaking News: 
No