प्रचार सभेनंतर ओवेसींनी असे काही केले, सगळे बघतच राहिले!

मुंबई : महाराष्ट्रात सगळीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आहे. सगळे नेते आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. पक्षांमध्ये काँटे की टक्कर असल्यामुळे सगळ्याच नेत्यांनी कंबर कसली आहे. एकामागून एक प्रचार सभांचा सपाटाच लावला आहे. असं तणावाचं वातावरण असताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी मात्र मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.  

औरंगाबादमध्ये प्रचारसभा झाल्यानंतरचा ओवैसी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. गुरूवारी औरंगाबादमध्ये पैठण गेट येथे रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर ओवैसी 'मियां मियां मिया भाय' या  डान्स करताना दिसले.

मंचावरून खाली उतरताना फूलांचा हार हातात घेऊन ओवैसी पायऱ्या उतरत होते. तेव्हा 'मिया मिया मिया भाय' हे गाणं सुरू होतं त्यावर ओवैसींनी विचित्र प्रकारे डान्स केला. याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ओवैसी आपली निशाणी 'पंतग' ची ढिल देणारी ऍक्शन करत असल्याचं दिसत आहेत. 

असदुद्दीन ओवैसी यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ओवैसी कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण आता त्यांचा हा व्हिडिओ चर्चेत आला असून खूप व्हायरल होत आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
AIMIM Chief Asaduddin Owaisi performs a dance step after the end of his rally at Paithan Gate in Aurangabad
News Source: 
Home Title: 

प्रचार सभेनंतर ओवेसींनी असे काही केले, सगळे बघतच राहिले!

प्रचार सभेनंतर ओवेसींनी असे काही केले, सगळे बघतच राहिले!
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
प्रचार सभेनंतर ओवेसींनी असे काही केले, सगळे बघतच राहिले!
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, October 19, 2019 - 13:12