धक्कादायक! २२ वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता, प्रियकराने डोळ्यावर पट्टी बांधून पळवून नेले, अन्...

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune 22 years old Women Missing:  पुण्यातील (Pune News) चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक बाब समोर येत आहे. 22 वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता झाली आहे. तरुणीला फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी करत आहेत. तरुणीच्या तपासासाठी पोलिसांचे एक पथक दिल्लीला (Delhi) रवाना झाले आहेत. (Pune Crime News)

डोळ्यावर पट्टी बांधून पळवून नेले

लग्नाचे आमिष दाखवून एका 22 वर्षे तरुणीला सैफ नावाच्या तरुणाने पळवून नेले होते. मात्र पळून गेल्यानंतर प्रियकर विवाहित असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने आपण परत येत असल्याचे आपल्या मैत्रीणीला फोन करून सांगितले. तसेच तिचे लाइव्ह लोकेशनसुध्दा पाठवले होचे. मात्र ही तरुणी अद्यापही परतली नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी तिला पळून नेले आहे. चंदननगर पोलिसांनी सैफ (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, तरुणीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

प्रियकर आधीच विवाहित

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये काम करणारी तरुणी आणि 22 वर्षे तरुणी पेइंग गेस्टमध्ये राहतात. या तरुणीचे एका सैफ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आरोपी सैफ याने लग्न करण्याच्या आमिषाने तिला पळून नेले होते. परंतु पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे कळले व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तिच्या मैत्रिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तसंत, मी इथून निघून येत आहे असंही तिने मैत्रिणीला सांगितले. मात्र अजूनही ती परतली नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

सैफने माझ्या डोळ्याला पट्टी बांधून अनोळखी ठिकाणी आणले आहे. तसंच तेथे बरेच लोक आहेत. मी तुम्हाला गुपचूप लाइव्ह लोकेशन पाठवत आहे" असे सांगून त्या तरुणीने तिच्या मैत्रिणीला नोएडा दिल्ली येथील लाइव्ह लोकेशन पाठवले आहे. मात्र ती तरुणी अद्याप पुण्यात परतलेली नाही. त्यामुळं धास्तावलेल्या तरुणीच्या मैत्रिणीने पोलिस स्थानकात धाव घेत घडलेली घटना पोलिसांना सांगितली आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी एक टीम दिल्ली इथे रवाना  करण्यात आली आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
22 year old girl went missing from Pune police filed complaint
News Source: 
Home Title: 

Love, Comitment और धोका! पुणेकर तरुणी बॉयफ्रेंडसोबत दिल्लीला पळून गेली पण...

 

धक्कादायक! २२ वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता, प्रियकराने डोळ्यावर पट्टी बांधून पळवून नेले, अन्...
Caption: 
22 year old girl went missing from Pune police filed complaint
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
धक्कादायक! २२ वर्षीय तरुणी पुण्यातून बेपत्ता, प्रियकराने डोळ्यावर पट्टी बांधून पळवले
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, June 8, 2023 - 12:21
Created By: 
Manasi Kshirsagar
Updated By: 
Manasi Kshirsagar
Published By: 
Manasi Kshirsagar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
298