दोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट

Crime News : राजस्थानच्या (rajasthan) बारमेर जिल्ह्यात एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी बारमेरच्या आटी गावात आटी गावात दोघांनीही गळफास घेत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येने संपूर्ण राजस्थानमध्ये (rajasthan crime news) खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आत्महत्या केलेले प्रियकर आणि प्रेयसी दोघेही आधीपासून विवाहीत होते. दोघांनाही मुले असून तपासात माघीबाई भूपराम आणि मधा राम अशी त्यांची नावे असल्याची समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील आटी गावात हा सर्व प्रकार घडला. मधा रामचे माघीबाईसोबत बराच काळापासून प्रेमसंबंध होते. एका लग्न समारंभात दोघे एकमेकांना भेटले होते. त्यानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. मधा रामला दोन तर माघीबाईला चार मुले आहेत. प्रेमप्रकरणामुळे मधा रामचा पत्नीशी वाद होत होता. या घटनेपूर्वी त्याची पत्नी मुलांसह तिच्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मधा राम आणि माघीबाई हे दोघे घरातून कोणालाही न सांगता बेपत्ता झाले होते. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. बुधवारी दोघांचे मृतदेह मधा राम यांच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

माघी बाई यांना चार आणि माधा राम यांना दोन मुले आहेत. दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संबंध होते. मात्र त्यांच्या या नात्यावर दोघांच्या नातेवाइकांनी आक्षेप घेतला होता. मात्र दोघांनीही कुणाचेही ऐकले नाही. यावरून दोघांच्या कुटुंबात भांडण झाले. मधा रामची पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. त्यानंतर एके ठिकाणी जात दोघांनीही दारु प्यायली आणि रिल्स तयार केले. यानंतर मधा रामने रिल्स त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. त्यानंतर दोघांनीही आत्महत्या केली.

दुसरीकडे याआधीही बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या गोलिया कलान गावात, प्रेमी युगुलाने निर्जनस्थळी झाडाला लटकून आत्महत्या केली होती. प्रियकर-प्रेयसी हे दोघेही नातेवाईक असल्याचे समोर आले होते. धक्कादायक बाब म्हणजे दोघेही अल्पवयीन होते. गोलिया कलान गावात मुलीच्या ओढणीला गळफास लावून आत्महत्या केली. दोघांनीही घरापासून तीन किमी अंतरावर जाऊन आत्महत्या केली आहे. लोकांनी दोघांना लटकलेले पाहून पोलिसांना माहिती दिली होती.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
rajasthan crime news Couple end life after liquor party Made reel on insta
News Source: 
Home Title: 

दोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट

दोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
दोन मुलांचा बाप आणि चार मुलांची आई... एका लग्नात सुरु झालेल्या प्रेमकहाणी भयानक शेवट
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, January 14, 2023 - 14:42
Request Count: 
1
Is Breaking News: 
No