जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर

नवी दिल्ली : जे जीएसटी रिटर्न भरतात त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या लोकांची लेट फी सरकारला परत करणार आहे. अरुण जेटली यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

मंगळवारी दुपारी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, "करदात्यांच्या सोयीसाठी, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये जीएसटी रिटर्न भरणाऱ्या व्यक्तींची लेट फी माफ केले जाईल. करदात्यांच्या लेजरमध्ये ते परत केले जातील.

यापूर्वी, ज्या लोकांनी जीएसटी रिटर्न जुलैच्या शेवटी भरले होते अशा लोकांची जेखील लेट फी सरकारने माफ केली होती. त्याच वेळी सरकारने जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढविली होती. जीएसटी कायद्यानुसार, कर देयकास विलंब केल्यास प्रती दिवस 100 रुपये दंड लागतो. राज्य जीएसटी अंतर्गत देखील अशीच तरतूद करण्यात आली आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Good news for GST Payers
News Source: 
Home Title: 

जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर

जीएसटी भरणाऱ्यांसाठी सरकारची खुशखबर
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes