VIDEO: एक बाईक आणि काम फत्ते! शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; क्षणात तलावातलं पाणी पोहचवलं शेतात...
Farmer Desi Jugaad Video: आपल्या आयुष्यात आपण अनेक भन्नाट जुगाड करत असतो. या जुगाडाचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक जुगाड व्हिडीओ हा सोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी हुशार शेतकऱ्यानं असा काही जुगाड केला आहे की तुम्हालाही त्याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. शेतात अनेक तांत्रिक गोष्टीही आल्या आहेत परंतु सध्या असा जुगाड पाहून तर तुम्हीही म्हणाल की या शेतकऱ्यानं तर तंत्रज्ञानालाही मागे टाकलं आहे.
तलावातील पाणी शेतात पोहचवण्यासाठी या शेतकऱ्यानं भन्नाट जुगाड केला आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.
या व्हिडीओखाली चाहत्यांच्या कमेंट्सही येताना दिसत आहेत. यावेळी या देसी जुगाडाच्या व्हिडीओनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत. अनेकदा आपल्या वाट्याला अवघड कामं येताना दिसतात. त्यातून मार्ग काढायचा एक भन्नाट प्रयत्न म्हणजे हे देसी जुगाड. अनेक लोकं अशीच अवघडं कामं सोपी करण्यासाठी असे भन्नाट देसी जुगाड करताना दिसतात. आपल्या देशातील लोकं हे देसी जुगाड करण्यात किती माहीर आहेत हे आपल्यालाही काही वेगळं समजायला नको अथवा कळायला नको. सध्या या शेतकऱ्यानं लावलेल्या या शोधामुळे पुन्हा एकदा देसी जुगाडाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणंही अवघड झालं आहे. त्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय तो वेगळाच.
हेही वाचा : रात्रीचं जेवण टाळण्याची चूक करताय? मग 'या' गंभीर परिणामांना सामोर जायची तयारी ठेवा
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तलावातील पाणी हे शेतात सोडण्यासाठी पाईप जोडला आहे. पाईपचे एक टोक हे बाईकला जोडलंय तर दुसरं टोकं हे तलावातील पाण्यात ठेवलं आहे. यावेळी बाईक सुरू करतानाच तलावातील पाणी हे बाहेर येताना दिसतंय. आपण सोशल मीडियावर पाहतो की ट्रॅक्टर किंवा ट्रकचा वापर करून शेतात नाना तऱ्हेचे देसी जुगाड व्हिडीओ हे केले जातात. त्यात आता तर बाईकचा वापर करून देसी जुगाड करण्याचा हा अनोखा तिरका नेटकऱ्यांच्या पसंतीच पडला आहे.
@makhankhokhar_vlog या इन्स्टाग्राम अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 6 दिवसांपुर्वी पोस्ट केलेला हा व्हिडीओ जोरात व्हायरल झाला आहे. सोबत आतापर्यंत हा व्हिडीओ 8 लाख लोकांनी पाहिला आहे.
एक बाईक आणि काम फत्ते! शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड; क्षणात तलावातलं पाणी पोहचवलं शेतात...
