PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे

मुंबई : Small savings schemes:पीपीएफसह (PPF) अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे आता बचत योजनांवरील फायदे पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील, असे माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. त्यांनी याबाबत ट्टिट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Decision to reduce interest rates on other savings schemes, including PPF, will return, benefits will continue as before - Nirmala Sitharaman)

छोट्या बचत योजनांमध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी अशा सर्व लहान बचत योजनांचे व्याज दर कमी करण्यासाठी सरकारने 31 मार्च रोजी घोषणा केली आणि आज हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. 

अर्थमंत्र्यांनी लिहिले आहे की, भारत सरकारच्या छोट्या बचत योजनांवरील व्याज 2020-21च्या शेवटच्या तिमाहीत उपलब्ध असलेल्या दराने उपलब्ध राहील. म्हणजेच मार्च 2021 पर्यंत जे व्याज मिळत होते, तेच व्याज पुढेही मिळणार आहे. काल जारी केलेले आदेश मागे घेण्यात आले.

सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी Public Provident Fund (PPF)आणि  राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) (National Savings Certificate)यासारख्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात 1.1 टक्के कपात केली होती. ही कपात आज 1 एप्रिलपासून 2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी केली गेली होती. व्याज दर कमी होण्याच्या ट्रेंडच्या अनुषंगाने हे पाऊल उचलले गेले आहे. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पीपीएफवरील व्याज ०.7 टक्क्यांनी कमी करुन 6.4 टक्के करण्यात आले होता तर एनएससीवर ०.9 टक्के घटून 5.9 टक्के करण्यात आले  होते. आता हे व्याज दर कमी होणार नाहीत तर पूर्वी प्रमाणे असणार आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Decision to reduce interest rates on other savings schemes, including PPF, will return, benefits will continue as before - Nirmala Sitharaman
News Source: 
Home Title: 

PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे

PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे
Caption: 
संग्रहित फोटो
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, April 1, 2021 - 08:48
Request Count: 
1
Is Breaking News: 
No