नाराज व्यापारी वर्गाला मोदींचा चुचकारण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : भाजपचा हक्काचा मतदार समजला जाणारा व्यापारी वर्ग सध्या काहीसा दुरावलाय, नाराज झाला आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे दुरावलेल्या व्यापारी वर्गाला चुचकारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये व्यापाऱ्यांची रॅली सुरु झाली आहे. या वर्गाला चुचकारण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करत आहेत.
व्यापाऱ्यांच्या दुराव्याचा फटका राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये बसला होता. त्यानंतर सादर झालेल्या अर्थसंकल्पात व्यापारी वर्गासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळवणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना करात सवलत देण्यात आली आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रातही पुन्हा सत्ता आल्यास व्यापारी वर्गाला निवृत्ती वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे. यापार्श्वभूमीवर मोदींचा हा व्यापारी वर्गाशी संवाद महत्वाचा मानला जात आहे.
नाराज व्यापारी वर्गाला मोदींचा चुचकारण्याचा प्रयत्न
