टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यात एकमेव खेळविलेल्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने लंकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.

कोलंबोतील प्रेमदासा स्टेडीयमवर झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेवर तीन विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेलं १७१ रन्सचं आव्हान भारतीय टीमने १९.२ ओव्हर्समध्ये गाठत विजय साजरा केला.

श्रीलंकेच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियातील रोहित शर्मा केवळ ९ रन्सवर आऊट झाला. तर लोकेश राहुल २४ रन्सवर आऊट झाला. मग आलेल्या कॅप्टन विराट कोहलीने जबरदस्त बॅटींग करत ५४ बॉल्समध्ये ८२ रन्सची खेळी खेळली. यामध्ये ७ फोर आणि एका सिक्सरचा समावेश आहे. विराट कोहलीने खेळलेल्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवता आला.

मॅचच्या सुरुवातीला टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत १७० रन्सपर्यंत मजल मारली. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Team India won by 7 wickets
News Source: 
Home Title: 

टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
Caption: 
Image Courtesy: PTI
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Sunil Desale