पुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
पुण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिच्या पतीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस विभागात कार्यरत होते. रुपाली साळवी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती श्रेयस साळवी याला पोलिसांनी अटक केलीय.
विश्रांतवाडी परिसरता कळस इथं आपल्या राहत्या घरी पोलीस कॉन्स्टेबल रुपाली साळवी यांची धारदार शस्त्रानं पोलीस कॉन्स्टेबल श्रेयस साळवी यांनी हत्या केली केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस साळवी यांनी रुपाली यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना श्रेयस साळवी यांनीच ससून हॉस्पिटलमध्ये आणलं.
तपासांतर्गत डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी चौकशी केली असता, श्रेयस साळवी समाधानकारक उत्तरं देऊ शकले नाही. अखेर पोलिसांनी श्रेयस साळवी यांना पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली.
साळवी दांपत्य स्पेशल ब्रँचमध्ये काम करत होतं. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. या वादातूनच हत्या झाल्याची शक्यता व्यक्त होतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pune - Police Constable Kills his police constable Wife
Home Title: 

पुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या

No
164220
No
Authored By: 
Aparna Deshpande