नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

कोल्हापूर : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केलीय. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात हा विस्तार करण्यात येणार आहे. 

विस्तारात एकूण 12 मंत्र्यांचा समावेश असेल. यात भाजपचे 6, घटक पक्षांचे 4 तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश असणार आहे. 

बिहार निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार असे संकेत दिले होते. त्यानंतर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कोल्हापुरात संकेत दिले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
cabinet expanction shiv sena and other party gets portfolio
News Source: 
Home Title: 

नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात मंत्रीमंडळ विस्तार
Yes
No