Viral Video : आजीबाईची कमाल, चक्क तिसऱ्या थरावर चढत फोडली हंडी
मुंबई : यंदा दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दहीहंडी सणात गोविंदांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मुंबईतील जय जवान दहीहंडी पथकाने आपली बादशाहत कायम ठेवली. या मंडळाने 9 थर लावत आपला दरारा कायम राखला. मात्र अशातच एका आजीबाईंचा व्हीडिओ दहीहंडीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (old women enjoy dahi handi video viral on social media)
उतार वयात अनेक वृद्धांना नीट चालता येत नाही, त्यांना काठीचा आधार घ्यावा लागतो. मात्र या आजीबाई या सर्व प्रकाराला अपवाद ठरल्यात. आजीबाईंनी थेट हंडी फोडलीय.
महिलांनी 3 थरांची हंडी लावली होती. त्यावेळी या आजीबाई हंडी फोडण्यासाठी तिसऱ्या थरावर चढल्या. तिसऱ्या थरावर चढल्यानंतर आजीबाईचा बॅलन्स बिघडला. पण, या आजीबाईनं दोरी घट्ट पकडून हंडी फोडलीच.
तरुणांनाही लाजवेल अशा जोशात या आजीबाईनं हंडी फोडली. हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आजींनी फोडलेली दहीहंडी सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनलाय.
Viral Video : आजीबाईची कमाल, चक्क तिसऱ्या थरावर चढत फोडली हंडी
