Mumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

Threats to mount mary church : एतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी चर्चला (Mount Mary Church) बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Threats to mount mary church) देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर-ए-तोयबा (lashkar-e-taiba) या दहशतवादी संघटनेने ही धमकी दिली आहे. हा धमकीचा ईमेल (Email)  आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. माउंट मेरी चर्च येथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात जत्रा भरते. अशातच नाताळनंतर (Christmas) आता आलेल्या या धमकीनंतर पोलिस (Mumbai Police) अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय. (lashkar e taiba threatens to blow up the famous mount mary church in mumbai with bombs marathi news)

माउंट मेरी चर्चला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर-ए-तोयबा या (lashkar-e-taiba) दहशतवादी संघटनेने ही ईमेलद्वारे दिल्याने या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला (Mumbai Police Filed a case) आहे. मुंबईतील माउंट मेरी चर्च हे भारतातील पाच सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे चर्च येशू ख्रिस्त यांची माता मदर मेरी यांना समर्पित आहे. 

आणखी वाचा - New Year Celebration : मासे खाऊन नववर्षाचे स्वागत करणार असाल तर सावधान!

केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता असलेल्या या चर्चवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे अनेक लोक येऊन नवस करतात. येथे केलेला नवस पूर्ण होतो अशी या अनेक लोकांची श्रद्धा आहे. या चर्चमध्ये दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी मदर मेरीचा (Mother Mary) वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यात येथे आठवडाभर मदर मेरीची जत्राही (Mother Mary the fair) भरते. येथे अनेक धर्माचे लोक नवस करण्यासाठी येतात. मलायका अरोरा, जॉन अब्राहम यांसारखे अनेक सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) येथे येत असतात. हे चर्च गेल्या 300 वर्षांपासून मुंबईची (Mumbai News) ओळख आहे. हे देखणे चर्च 1660 मध्ये बांधले गेले. या प्रसिद्ध चर्चचे 1761 मध्ये नूतनीकरण करण्यात आले.

दरम्यान, नाताळ ते न्यू ईयरच्या (New year) दरम्यान मोठ्या प्रमाणात लोक या चर्चेमध्ये येतात. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशातच आता दहशदवादी संघटनेच्या धमकीमुळे आता पोलीस यंत्रणा दक्षता घेत आहे. ख्रिसमसच्या दिवशी मुंबईत नाताळची धूम पहायला मिळाली होती. अशातच आता न्यू ईयरच्या सिलेब्रेशनला (New Year Celebration) गालगोट लागू नये, म्हणून पोलीस यंत्रणा (Mumbai Police) काळजी घेताना दिसत आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
lashkar e taiba threatens to blow up the famous mount mary church in mumbai with bombs marathi news
News Source: 
Home Title: 

मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!

Mumbai News: मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!
Caption: 
mount mary church
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
मुंबईतील Mount Mary Church लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर; बॉम्बने उडवण्याची धमकी!
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, December 30, 2022 - 18:44
Request Count: 
1
Is Breaking News: 
No