काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र

Baba Siddique Entered NCP: कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. यावेळी त्यांनी आपला आधीचा पक्ष कॉंग्रेसवर टीका केली. काही दिवसांपुर्वीच त्यांनी आपल्या कॉंग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार? याबद्दल चर्चा सुरु होत्या. दरम्यान बाबा सिद्दीकी राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

मला राजकारणात इथपर्यंत सुनील दत्त यांनी आणल्याची आठवण बाबा सिद्दीकी यांनी केली. काँग्रेस पक्षात माझे मतभेद झाले. कॉंग्रेसमध्ये माझं मन दुखावलं गेलं अशी टीका बाबा सिद्दीकी यांनी केली. कढीपत्त्याप्रमाणे आमचा उपयोग झाल्याचेही ते म्हणाले. 

प्रफुल पटेल यांच्यासोबत माझी राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात चर्चा झाली होती. त्याच दिवशी मी काँग्रेस हाय कमांडच्या लोकांना पक्ष सोडत असल्याचे कळवले होते, असे बाबा सिद्दीकी यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Baba Siddique Enter NCP Ajit Pawar Group attacked on Congress
News Source: 
Home Title: 

काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र

काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र
Caption: 
Baba Siddique NCP
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Pravin Dabholkar
Mobile Title: 
काँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, - राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकीं
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, February 10, 2024 - 19:33
Created By: 
Pravin Dabholkar
Updated By: 
Pravin Dabholkar
Published By: 
Pravin Dabholkar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
203