खासदार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला इशारा

कराड : साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. अपक्ष उमेदवारीवरुन एका एकाची पुंगी वाजवू शकतो, अशा शब्दात त्यांनी चपराक लगावली आहे. नेहमीच आपल्या वेगळया स्टाईलसाठी प्रसिध्द असलेले उदयनराजे भोसले यांनी आपली कॅालर उडवत राष्ट्रवादीच्याच सातारा जिल्ह्यातील आमदारांना सज्जड दम भरला आहे.

लोकशाही आहे म्हणूनच गप्प आहे राजेशाही असती तर एका एका आमदाराला दाखवले असते. हिम्मत असेल तर मैदानात या... अपक्ष उमेदवारी भरुन एकाएकाची पुंगी वाजवतो की नाही ते बघाच असा इशारा त्यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिला. माझे पोट राजकारणावर चालत नाही , 
मुख्यमंत्री यांच्याशी झालेली चर्चा आत्ताच का सांगू ? पण चर्चा झाली एवढे नक्की... अशी माहितीही त्यांनी दिली. शरद पवार हे आदरणीय व्यक्ती असून त्यांनी माझी कॅालरची केलेली स्टाइल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचे समाधान वाटले असंही यावेळी उदयनराजे भोसले म्हणाले.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Udayanraje bhosale warned NCP
News Source: 
Home Title: 

खासदार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला इशारा

खासदार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला इशारा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
खासदार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीला इशारा