Petrol Rate Today : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price on 29 May 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. सध्या ते प्रति बॅरल $75 च्या वर आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 77.59 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $ 73.41 वर कायम आहे. परिणामी मे महिना संपत आला असला तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol diesel price) कोणताही दिलासा मिळाला नाही. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान 22 मे 2022 पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

महाराष्ट्रात (Maharashtra Petrol Rate) पेट्रोलची सरासरी 106.90 रुपये दराने विक्री होत आहे. काल, 28 मे 2023 पासून महाराष्ट्रातील किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सरासरी 106.90 रुपये प्रति लिटर या दराने बंद झाले, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची (Maharashtra Diesel Rate) सरासरी 93.49 रुपये दराने खरेदी-विक्री होत आहे. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात डिझेलच्या किमती सरासरी 93.49 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाले आहेत. 

शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.36 92.88
अकोला  106.45 92.99
अमरावती  107.61 94.11
औरंगाबाद  106.75 93.24
भंडारा  107.11 93.62
बीड  106.84 93.35
बुलढाणा  106.44 92.98
चंद्रपूर  106.54 93.09
धुळे  106.79 93.30
गडचिरोली  106.92 93.45
गोंदिया  107.85 94.33
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.66 94.15
जळगाव  106.43 92.95
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  107.40 93.90
लातूर  107.92 94.39
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.04 92.59
नांदेड  108.03 94.52
नंदुरबार  106.84 93.34
नाशिक  106.76 93.26
उस्मानाबाद  106.92 93.43
पालघर  106.54 93.02
परभणी  109.01 95.42 
पुणे  106.07 92.58
रायगड  105.91 92.41
रत्नागिरी  107.48 93.97
सांगली  106.49 93.02
सातारा  106.33 92.83
सिंधुदुर्ग  107.98 94.46
सोलापूर  106.32 92.85
ठाणे  106.40 92.87
वर्धा  106.18 92.72
वाशिम  107.07 93.59
यवतमाळ  106.49 93.04

असे जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर सहज जाणून घेवू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल, तर तुम्ही 9224992249 वर RSP नंतर शहर कोड पाठवू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असल्यास, RSP लिहून 9223112222 वर एसएमएस पाठवू शकता.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
petrol diesel price on 29 may 2023 in maharashtra new rates of fuel in marathi
News Source: 
Home Title: 

Petrol Rate Today : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर

Petrol Rate Today : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर
Caption: 
petrol diesel price on 29 may 2023 in maharashtra
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
श्वेता चव्हाण
Mobile Title: 
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, पाहा तुमच्या शहरातील दर
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, May 29, 2023 - 08:16
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
228