पुण्यातील बड्या राजकीय गुरूला अटक

पुणे : एका विवाहित स्त्रीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या पुण्यातील बड्या राजकीय गुरूला चतुःश्रुंगी पोलिसांनी अटक केली आहे. 'उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण' या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Big Political Guru Raghunath Yemul arrested in Pune ) 

याप्रकरणी रघुनाथ येंमुलने प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 48 वर्षीय रघुनाथ येंमुल पुण्यातील मोठा राजकीय गुरू म्हणून ओळखला जातो. रघुनाथ येंमुलनेला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. येंमुलनेच्या अटकेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

'तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर तुझी ही बायको म्हणून कायम राहिली तर आमदार, मंत्रीही होणार नाही, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे, असा सल्ला प्रतिष्ठित कुटुंबाला या राजकीय गुरूने दिल्याचं अटके माघील कारण आहे.

रघुनाथ येंमुलने पती गणेश गायकवाड याला आपल्या पत्नीविरोधात भडकावलं. याप्ररणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांना अटकपूर्व जामीन झाला आहे. पती गणेश आणि राजु अंकुश फरार झाले आहेत. 27 वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जानेवारी 2017 पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Big Political Guru Raghunath Yemul arrested in Pune
News Source: 
Home Title: 

पुण्यातील बड्या राजकीय गुरूला अटक

पुण्यातील बड्या राजकीय गुरूला अटक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
पुण्यातील बड्या राजकीय गुरूला अटक
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, July 12, 2021 - 07:18
Request Count: 
1
Is Breaking News: 
No