रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड

मीरा रोड : मीरा रोडमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारानं मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सय्यद इशान हैदर रिजवींना वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अत्यंत गंभीर अवस्थेत आणलं होतं. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचं शरीर कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हतं. मात्र, डॉक्टरानी वैद्यकीय प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात नया नगरमधील त्यांच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड सुरु केली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे असं कळताच पोलिसांना पाचारण केलं. या मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. या प्रकरणाती संपूर्ण माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलाय. तोडफोडीबद्दल मीरा रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Angry relatives of patient vandalise hospital in Miraroad
News Source: 
Home Title: 

रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड

रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड
No
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
रुग्णाच्या नातेवाईकांकडून वोक्हार्ट हॉस्पिटलची तोडफोड