आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा नातू पार्थ पवार आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या नावही घेतले जाऊ लागले. पण या बातमीत तथ्य नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. 

Image result for aaditya thackeray zee news

शिवसेना नेते, युवासेनेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा सुरू  होती. ही चर्चा शिवसेनेने नाकारली आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत मात्र सत्ता आणि राजकारणावर ते अंकुश ठेवतील असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर मध्य मुंबई किंवा उत्तर पश्चिममधून आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कोणीही निवडणूक लढलेली नाही. पण आदित्य ठाकरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. उत्तर मध्य मुंबई हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन तर उत्तर पश्चिममधून गजानन किर्तीकर खासदार आहेत.

Image result for aaditya thackeray zee news

उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. यामध्ये वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, विलेपार्ले, कुर्ला, कलिना, चांदिवली या विधानसभा मतदास संघांचा समावेश होतो. तर उत्तर पश्चिम हा शिवसेनेकडे आहे. यामध्ये दिंडोशी, अंधेरी पश्चिम, गोरेगाव, अंधेरी पूर्व, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व या विधानसभा मतदास संघांचा समावेश होतो. सध्या उत्तर मध्यमध्ये पूनम महाजन तर उत्तर पश्चिममध्ये गजानान कीर्तीकर खासदार आहेत.

Image result for aaditya thackeray zee news

उल्लेखनीय म्हणजे, ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कुणीही निवडणूक लढवलेली नाही. परंतु, याआधी आदित्य ठाकरेंनी मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनची निवडणूक फक्त लढवलीच नाही तर जिंकलीसुद्धा आहे. त्यामुळे, आदित्य लोकसभा निवडणुकीला उभं राहणारी ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ठरणार का? याबद्दलही अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. पण आता या गोष्टीवरील पडदा उघडण्यात आला आहे.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Aditya Thackeray will not contest the election Says Sanjay Raut
News Source: 
Home Title: 

आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत

आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
आदित्य ठाकरे निवडणूक लढणार नाहीत पण सत्तेवर अंकुश ठेवतील- संजय राऊत
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, March 12, 2019 - 17:08