"पंतप्रधान मोदींनी 3 तासांसाठी थांबवलेलं Russia-Ukraine युद्ध"

Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनमधून सुखरुप सुटका करता यावी, यासाठी रशिया-युक्रेन युद्ध  (Russia Ukraine War) 3 तासांसाठी थाांबवलं होतं, असा दावा माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी केला आहे. ते शुक्रवारी पाटण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (prime minister narendra modi stopped russia ukraine war 3 hours claimed bjp ex minister ravi shankar prasad)

रवीशंकर प्रसाद काय म्हणाले?  

"रशिया-युक्रेन युद्ध ऐन जोरावर असातानाचा हा सर्व प्रकार आहे. या सर्व युद्धादरम्यान यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी असलेले भारतीय विद्यार्थी तिथे अडकले होते", असं  प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

"या अशा युद्धजन्य परिस्थितीत आपल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करणं आव्हानात्मक होतं. यानंतर पंतप्रधान मोदींनी युक्रेन आणि रशियातील भारतीय उच्चायुक्तांना विद्यार्थ्यांच्या सुटकेबाबत विचारणा केली. त्यानंतर उच्चायुक्तांनी युद्ध संपल्यानंतरच विद्यार्थ्यांची सुटका करता येईल, असं पंतप्रधानांना सांगितलं. तसेच पंतप्रधान युद्ध थांबवण्यात सक्षम होते", असं रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांची दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींसोबत संवाद

"उच्चायुक्तांच्या सल्ल्यानंतर मोदींनी युद्ध रोखण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे वलोडिमिर झेलेंस्की यांच्यासोबत चर्चा केली. जेणेकरुन भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करता येईल. यानंतंर विद्यार्थ्यांसाठी 3 तास युद्ध थांबवण्यात आलं. जगात ही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही ताकद", असं प्रसाद म्हणाले.  

केंद्र सरकारचं 'ऑपरेशन गंगा'

रशिया आणि युक्रेनमध्ये जोरात युद्ध सुरु होतं. याच वेळेस भारतातील अनेक वैद्यकीय विद्यार्थी हे कीव, खारकीव, मारियुपोल आणि इतर शहरांमध्ये अडकलेले. मात्र केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांची 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत सुखरुप सुटका केली.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
prime minister narendra modi stopped russia ukraine war 3 hours claimed bjp ex minister ravi shankar prasad
News Source: 
Home Title: 

"पंतप्रधान मोदींनी 3 तासांसाठी थांबवलेलं Russia-Ukraine युद्ध"

"पंतप्रधान मोदींनी 3 तासांसाठी थांबवलेलं Russia-Ukraine युद्ध"
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
"पंतप्रधान मोदींनी 3 तासांसाठी थांबवलेलं Russia-Ukraine युद्ध"
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, June 4, 2022 - 17:09
Request Count: 
1
Is Breaking News: 
No