काळा चष्मा आणि विचित्र शैली, तरुणाचा असा स्वॅग कधीही न पाहिलेला... एकदा हा व्हिडीओ पाहा
मुंबई : सोशल मीडियावर मनोरंजक गोष्टींची कमतरता नाही. येथे आपल्याला आपल्या आवडीचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहायला मिळतात. जे आपल्याला काही गोष्टी शिकवतात देखील. म्हणून तर इथे ऑनलाईन आल्यावर लोकांचा वेळ कसा जातो, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. काही तरुण मंडळी सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी किंवा जास्त फॉलोअर्ससाठी जीवघेणे स्टंट देखील करत असतात. हे स्टंट करताना ते आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत. ज्यामुळे अनेकांना दुखापत झाल्याचे देखील तुम्ही पाहिले असेल, तर अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागते.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो खूपच मजेदार आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या वेगळ्याच स्टाईलमध्ये बाईक चालवत आहे. अशाप्रकारे बाईक चालवताना तुम्ही कधीच कोणाला पाहिलं नसेल.
व्हिडिओमध्ये बाईक चालवणाऱ्या व्यक्तीने काळा चष्मा लावला आहे आणि मोठ्या स्वॅगनेमध्ये तो बाईक चालवत आहे. हा वक्ती बाईकवर आपल्या सर्वांसारखा बसलेला नाही, तर तो त्याचे दोन्ही पाय खाली जमीनीवर ठेऊन बाईकच्या बाजूने बसला आहे आणि आपल्या स्वॅगमध्ये गाडी गोलगोल फिरवत आहे.
त्याची ही विचित्र शैली तुम्ही पाहाच, तुम्ही नक्की थक्क व्हाल.
अवघ्या काही सेकंदांच्या या ट्रेंडिंग व्हिडीओने लोकांना खूप हसवले आहे. काही लोक या स्टंटचे कौतुक करताना दिसले, तर काही लोकांनी त्या व्यक्तीची खिल्लीही उडवली आहे.
काहीही असो, व्हिडिओने युजर्सचे खूप मनोरंजन केले आहे. हा व्हिडीओ 15 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केले आहे, तर हजारो लोकांनी कमेंटही केल्या आहेत.
काळा चष्मा आणि विचित्र शैली, तरुणाचा असा स्वॅग कधीही न पाहिलेला... एकदा हा व्हिडीओ पाहा
