फेसबुकवर मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने मुलीची आत्महत्या...
टीकमगढ : मध्यप्रदेशातील टीकमगढ जिल्हातील महाराजपूर भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २० वर्षाच्या एका युवतीने गावातील एका मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने आत्महत्या केली आहे. समाज पंचायतीने त्या मुलांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
गुन्हा दाखल
कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रभारी निरीक्षक नवल आर्यने गुरूवारी सांगितले की, युवतीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल राजा वाल्मिक (२२), मुन्नी रायकवार (३५) आणि सानू रायकवार (४०) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिष्कार टाकला
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजासोबत या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाज्याने त्या मुलीवर व तिच्या परिवारावर बहिष्कार टाकला. हा फोटो मुन्नी आणि सोनूने व्हायरल केला. यामुळे खचलेल्या युवतीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी आरोपींची अधिक तपासणी सुरू आहे.
फेसबुकवर मुलासोबतचा फोटो व्हायरल झाल्याने मुलीची आत्महत्या...

धक्कादायक प्रकार
मुलासोबतचा फोटो व्हायरल समोर
समाज्याने टाकला बहिष्कार