चिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू

Covid Cases in Maharashtra : महाराष्ट्र (Maharashtra Corona Case) आणि मुंबईत (Mumbai Corona case) वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी (18 एप्रिल 2023) 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एप्रिलमधील मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. तर त्याचदिवशी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह (corona cases) रुग्णांमध्ये वाढ झाली असून 949 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर सोमवारी 505 रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत मंगळवारी 220 रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 22 मार्चपासून सक्रिय रुग्णांच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. वर्षअखेरीस मे महिन्यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून पाच ते सहा हजारच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याचा दैनंदिन सकारात्मकता दर 6% वर घसरला आहे. तर मुंबईचा 11% आहे. परिणामी राज्यात 6,118 कोरोना रुग्णसंख्या आहे तर शहरात 1,677 सक्रिय कोरोना रुग्णसंख्या आढळून आली आहे. राज्याच्या अहवालानुसार, पुण्यात दोन आणि सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

वाचा : आज 'इतक्या' रुपयांनी सोने महाग, तर चांदी...जाणून घ्या दर

दिल्लीत 1500 हून अधिक रुग्णसंख्या

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे 1 हजार 537 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान कोविडमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. 

यूपीमध्ये कोरोना रुग्ण 821 वर

गेल्या 24 तासांत यूपीमध्ये कोरोनाचे 821 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी लखनौमध्ये 175, गौतम बुद्ध नगरमध्ये 129, गाझियाबादमध्ये 93 आणि मेरठमध्ये 62 प्रकरणे समोर आली आहेत. यासह राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 4008 वर पोहोचली आहे.

राजस्थानमध्ये 500 हून अधिक कोरोना रुग्ण 

राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची लागण झालेल्या आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 547 नवीन रुग्ण आढळले आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी राजधानी जयपूर आणि झालावाडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा या प्राणघातक संसर्गामुळे मृत्यू झाला. या 547 प्रकरणांमध्ये जयपूरमधील 135, भरतपूरमधील 69, अलवरमधील 50, नागौरमधील 43, जोधपूरमधील 42 आणि बिकानेरमधील 32 प्रकरणांचा समावेश आहे.

मास्क वापरण्याचा सल्ला

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पश्चिम बंगाल सरकारने एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. वृद्ध, लहान मुले, गरोदर महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच मास्क वापरा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Covid Cases in Maharashtra Coronavirus India updates India reports new Covid cases active
News Source: 
Home Title: 

चिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू 

चिंता वाढली! महाराष्ट्रात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
Caption: 
Covid Cases in Maharashtra
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
श्वेता चव्हाण
Mobile Title: 
Corona Update : चिंता वाढली! राज्यात 6000 हून अधिक कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, April 19, 2023 - 10:43
Updated By: 
Manoj Kadam
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
322