गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

Suhana Khan Viral Video : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान प्रमाणेच त्याची लेक सुहाना खान ही दिलदार आहे. शाहरुखची लेक सुहाना ही लोकप्रिय असलेल्या आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या स्टार किड्सपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. दरम्यान, आता सुहाना एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका महिलेनं भीक मागितल्यानंतर सुहानानं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य आणि त्यासोबतच आनंद झाला आहे. 

सुहाना ही तिचे वडील शाहरुख प्रमाणे दिलदार आहेत. तेच आता प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सुहाना एका कार्यक्रमातून बाहेर येत असल्याचे दिसत आहे. यावेळी सुहानानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.  सुहाना बाहेर येते हे पाहताच एक गरीब महिला तिच्याकडे भीक मागताना दिसत आहे. ती महिला सुहानाकडे पैसे मागताना दिसते, रडत असलेल्या या महिलेला पाहून सुहाना दया येते. त्यानंतर ती लगेच तिच्या क्लचमधून तिचं वॉलेट काढते आणि 500 ची नोट काढून त्या महिलेला देते. त्यानंतर ती महिला पुन्हा एकदा सुहानाच्या मागे जाते हे पाहता सुहाना तिला आणखी एक 500 रुपयांची नोट देते. त्यानंतर महिलेला जो आनंद होतो तो पाहण्यासारखा आहे. सुहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली! जसराज जोशी आणि आनंदी अडकले लग्न बंधनात

सुहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी कमेंट करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मला हे खूप जास्त आवडलं, तिला थोडापण अॅटिट्यूड नाही आहे. शाहरुख खाननं खूप चांगले संस्कार दिले आहेत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे खरंच खूप चांगलं आहे, नाही तर इतर सेलिब्रिटी पापाराझी असले तरी त्यांच्यासमोर यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.' तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ती खूप सुंदर दिसते आणि ती लोकांशी जोडून राहणारी आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तिनं त्या महिलेला पैसे दिले या गोष्टीचा आनंद आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला या गोष्टीचा आनंद होतो जेव्हा ज्या लोकांकडे सगळ्या गोष्टी आहेत त्यांना दुसऱ्यांचे दु:ख कळते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ही पहिली सेलिब्रिटी आहे जिच्याकडे बॅग आहे. बॅगमध्ये वॉलेट आहे आणि वॉलेटमध्ये पैसे देखील आहेत.' दरम्यान, सुहाना लवकरच झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सीरिजमध्ये दिसणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
suhana khan video of helping poor women gave her 1 k rupees watch viral video
News Source: 
Home Title: 

गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

 

गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल
Caption: 
(Photo Credit : Social Media)
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Diksha Patil
Mobile Title: 
गरीब महिलेनं पैसे मागताच सुहाना खाननं केलं असं काही... शाहरुखच्या लेकीचा 'तो' व्हिडी
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, August 12, 2023 - 13:42
Created By: 
Diksha Patil
Updated By: 
Diksha Patil
Published By: 
Diksha Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
350