रजनीकांत आणि अक्षयचा '२.०' फ्लॉप ठरणार?
मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा '२.०' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, हा सिनेमा सिनेगृहांत धुमाकूळ उडवू शकेल का? यावर प्रदर्शनाआधीच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
याचं कारण म्हणजे, हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान आणखीन तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीचा 'बागी २', कंगना रानौतचा 'मणिकर्णिका' तसंच हॉलिवूड सिनेमा 'एव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' यांचा समावेश आहे.
यापैंकी बागीचा प्रिक्वेल हीट ठरला होता.... तर मणिकर्णिका हा कंगनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ती या सिनेमावर खूपच मेहनत घेतेय. भारतात सध्य हॉलिवूड सिनेमांना चांगले दिवस आलेत. प्रेक्षक हे सिनेमे पसंत करत आहेत त्यामुळे 'एव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर'लाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो. यांमुळे '२.०'चा धोका वाढलाय.
अक्षय आणि रजनी दोघंही मोठे कलाकार आहेत... आणि त्यांची एक फॅन फॉलोईंगही आहे... हा सिनेमा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित होणार होता... परंतु, कधी बॉक्स ऑफिसवरील तारखांच्या क्लॅशमुळे तर कधी एडिटींगच्या कामामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली... आणि अखेर आता हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं बजेट तब्बल ४५० कोटी रुपये आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकतो किंवा नाही, हे लवकरच समजेल.
रजनीकांत आणि अक्षयचा '२.०' फ्लॉप ठरणार?
