'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला बाहेरचा रस्ता?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. कार्तिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. कार्तिक गेल्या काही दिवसांपासून कार्तिक त्याचा लोकप्रिय आणि ब्लॉकबस्टर चित्रपट 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiya 2) चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसली. या चित्रपटाचे यश पाहता निर्मात्यांनी 3 (Bhool Bhulaiya 3) भागाची तयारी सुरु केली आहे. यासाठी निर्मात्यांनी अनेक योजना केल्या आहेत. 

एवढंच नाही तर निर्माते 'भूल भुलैया 3' हा चित्रपटाचा तिसरा भागाची पूर्णपणे नवीन कथा आणि नवी शैली असणार आहे. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 90 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, तर चित्रपटाचा तिसरा भाग 140 कोटी रुपयांमध्ये बनवला जाणार असल्याची म्हटले जात आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या लीड स्टारकास्टबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

निर्माते चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या शोधात आहेत. या चित्रपटासाठी निर्माते दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) नावाचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांनी अजून दीपिकाशी संपर्क साधला नाही. पण दीपिका जर या चित्रपटात दिसली तर तिची आणि कार्तिकची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. याचा अर्थ जर दीपिकाची एण्ट्री झाली तर कियाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. या बातमीमुळे नक्कीच कियाराच्या चाहत्यांना निराशा झाली असणार. 

कार्तिक आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘शहजादा’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. रोहित धवन यांचं दिग्दर्शक असलेला हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात तो अलाया एफसोबत दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे शशांक घोषचा ‘फ्रेडी’ तसेच ‘सत्यनारायण की कथा’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ हे चित्रपट आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’ हा कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा एकत्र दुसरा चित्रपट असेल. ‘भूल भुलैय्या 2’मध्ये दोघांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. (Bhool Bhulaiyaa 2) ‘भूल भुलैय्या 2’ हा 2022 मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपट आहे. याने बॉक्स ऑफिसवर 181.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

दीपिकाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने सोशल मीडियावर या चित्रपटातील तिचा लूक शेअर केला होता.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Bhool Bhulaiya 3 Not Kiara Advani but this bollywood diva to romance with Kartik Aaryan
News Source: 
Home Title: 

'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला बाहेरचा रस्ता? 

'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला बाहेरचा रस्ता?
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'या' Bollywood Diva च्या एण्ट्रीनंतर, Bhool Bhulaiya 3 मधून कियारा अडवाणीला दाखवला ब
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, August 11, 2022 - 12:18
Created By: 
Diksha Patil
Updated By: 
Diksha Patil
Published By: 
Diksha Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No