प्रवासी बसमध्ये दाखवला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक

नवी दिल्ली : नीरज पांडे दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा इंटरनेटवर लीक झाला आहे. सिनेमा लीक झाल्याच्या वृत्ताने सिनेमाच्या संपूर्ण टीमला धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'अय्यारी' सिनेमाची पायरेटेड कॉपी बनवत एका सरकारी बसमध्ये प्रवाशांना दाखवण्यात आला. अशा प्रकारे सिनेमाची पायरसी होत असल्याने 'अय्यारी' सिनेमाच्या टीमसाठी एक मोठा धक्का आहे.

सिनेमाची पायरसी झाल्याने दिग्दर्शक नीरज पांडे खूपच नाराज झाले आहेत. त्यानंतर त्यांनी सरकार आणि नागरिकांना "नो टू पायरसी" म्हटलं आहे.

नीरज पांडे यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटमध्ये नीरज पांडे यांनी म्हटलं आहे की, "इतकी जागरुकता असतानाही सरकारी बसेसमध्ये सिनेमाची पायरेटेड कॉपी दाखवण्यात येते. या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करतो आणि स्पष्ट शब्दांत म्हणतो की, 'नो टू पायरसी'".

नीरज पांडे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा अय्यारी हा सिनेमा १६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या सिनमाने जवळपास १२ कोटींची कमाई केली आहे.

हा सिनेमा पूर्वी २५ जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार होता. मात्र, पद्मावत सिनेमा प्रदर्शित होत असल्याने अय्यारी सिनेमा ८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करण्याचं ठरलं. मात्र, संरक्षण मंत्रालयाने सिनेमा पाहिल्यावर त्यात काही बदल सुचवले. त्यानंतर हा सिनेमा १६ फेब्रवारीला प्रदर्शित करण्यात आला.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Aiyaary leaked: Transport bus plays pirated Sidharth Malhotra film
News Source: 
Home Title: 

टूरिस्ट बसमध्ये दाखवण्यात आला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक

प्रवासी बसमध्ये दाखवला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

अय्यारी सिनेमा ऑनलाईन लीक

पायरसीमुळे सिनेमाचे दिग्दर्शक नाराज

ट्विटरवर व्यक्त केली नाराजी

Authored By: 
Sunil Desale
Mobile Title: 
टूरिस्ट बसमध्ये दाखवण्यात आला 'अय्यारी' सिनेमा, ऑनलाईन लीक झाल्याने भडकले दिग्दर्शक