... म्हणून ऐश्वर्याने दिला इंटिमेट सीन्स देण्यास नकार !
मुंबई : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'फॅनी खान' हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मात्र या चित्रपटात ऐश्वर्याने बोल्ड किंवा इंटिमेट सीन्स देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिने दिलेल्या इंटिमेट सीन्सबद्दल खूप चर्चा झाली होती. त्यामुळे तिच्या या नकारातून ती त्या कॉन्ट्रावर्सीनंतर खूपच अलर्ट झाल्याचे दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्याने राजकुमार रावसोबत इंटिमेट सीन्स देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अनिल कपूरने या चित्रपटाचे चित्रीकरण यापूर्वीच सुरु केले आहे. तर राजकुमार राव 'न्यूटन' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
फॅनी खानमध्ये ऐश्वर्या आपल्या पेक्षा १० वर्षांने लहान असलेल्या राजकुमार रावसोबत दिसणार आहे. राजकुमार राव आणि ऐश्वर्याची ओळख 'मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' दरम्यान झाली होती. आधी या चित्रपटात राजकुमार रावच्या जागी आर. माधवन दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी यात राजकुमार रावचे नाव फायनल झाल्याचे समोर आले.
अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. गेल्या वर्षी आलेल्या करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातून तिने पुन्हा पदार्पण केले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि चित्रपटापेक्षा ऐश्वर्या-रणबीरच्या इंटिमेट सीन्सची चर्चा अधिक झाली. त्यानंतर भूमिका आणि चित्रपट निवडताना ऐश्वर्या पूर्वीपेक्षा जास्त चोखंदळ झाली आहे.
... म्हणून ऐश्वर्याने दिला इंटिमेट सीन्स देण्यास नकार !
