भांडणानंतर Partner सिगरेट घ्यायला जाताच, लोकप्रिय अभिनेत्रीनं गळफास घेत संपवलं आयुष्य

मुंबई : प्रेम कोणता दिवस दाखवेल याचा काहीच नेम नसतो. सध्या याच प्रेमाच्या नात्यानं एका अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबाला इतका वाईट दिवस दाखवला की, हे सर्व तिच्या जीवावर बेतलं. कलाविश्वाला हादरा देणाऱ्या या गंभीर प्रकरणी सध्या अभिनेत्रीच्या लिव्ह इन पार्टनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (pallavi dey death)

कोलकाता पोलिसांनी कारवाई करत अभिनेत्री पल्लवी डे हिच्या पार्टनंरला म्हणजे सागनिक चक्रवर्ती याला ताब्यात घेतलं आहे. पल्लवीच्या वडिलांनी गर्फा पोलीस स्थानकात हत्येची तक्रार दाखल केली, ज्यानंतर चौकशीसाठी म्हणून सागनिकला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

‘Mon Mane Na’ या गाजलेल्या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या पल्लवीनं राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवल्याची घटना नुकतीच घडली. ज्यामुळं संपूर्ण कलाजगताला हादरा बसला. पल्लवीच्या निधनामागे हत्येचा कट असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 

तिच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार सागनिक आर्थिकदृष्ट्या पल्लवीची फसवणूक करत होता. तिचं त्याच्यावर अफाट प्रेम होतं. किंबहुना तिनं दिलेली आलिशान कार घेऊनच तो फिरत होता. पल्लवी विविध प्रसंगी सागनिकला महागड्या भेटवस्तू देत होती. त्या दोघांची मिळून तीन बँक खाती होती, असंही पालकांनी दिलेल्या माहितीतून समोर आलं. (Sagnik Chakraborty)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mistuu (@pallavidey153)

सागनिकलाच पल्लवीचा मृतदेह आढळला होता. ज्यानंतर त्यानं पोलीस आणि तिच्या पालकांना याची माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार रविवारी सकाळीच सागनिक आणि पल्लवीमध्ये मोठा वाद झाला. ज्यानंतर तो सिगरेट घेण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला. 

सागनिक ज्यावेळी परतला तेव्हा दार आतून बंद असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि यानंतर पुढे जे काही झालं, तिथपासून आतापर्यंत जे काही घडलं ते सर्वकाही चाहते आणि पल्लवीच्या कुटुंबीयांना धक्का देऊन गेलं. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
actor Pallavi Deys live in partner Sagnik Chakraborty arrested 2 days after her death
News Source: 
Home Title: 

भांडणानंतर Partner सिगरेट घ्यायला जाताच, लोकप्रिय अभिनेत्रीनं गळफास घेत संपवलं आयुष्य 

 

भांडणानंतर Partner सिगरेट घ्यायला जाताच, लोकप्रिय अभिनेत्रीनं गळफास घेत संपवलं आयुष्य
Caption: 
छाया सौजन्य- सोशल मीडिया
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
भांडणानंतर Partner सिगरेट घ्यायला जाताच, लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, May 18, 2022 - 12:13
Created By: 
Sayali Patil
Updated By: 
Sayali Patil
Published By: 
Sayali Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No