बुद्धीच्या बाबतीत माणसांनादेखील मागे टाकतात 'हे' प्राणी

Feb 22,2025

मनुष्य

मनुष्य हा बुद्धीमान प्राणी असल्याचं आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र या जगात असेदेखील प्राणी आहेत, जे बुद्धीच्या बाबतीत माणसांना मागे टाकतात.


अशा प्राण्यांविषयी जाणून घ्या, ज्यांची स्मरणशक्ती मनुष्यापेक्षा अधिक आहे.

डॉल्फिन

डॉल्फिन इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक वेगाने गोष्टी शिकते तसेच, इतरांची नक्कल करण्यामध्येदेखील ती तरबेज आहे.

कावळा

कावळा हा पक्षी आपल्या बुद्धीमत्तेसाठी आणि हुशारीसाठी ओळखला जातो. असं म्हणतात, कावळे कोणत्याही समस्यांवर लवकर उपाय शोधू शकतात.

चिंपांझी

चिंपांझी हा प्राणी जगातील हुशार प्राण्यांपैकी एक मानला जातो. चिंपांझीला हत्यारांचा योग्य वापर कसा करावा? हे उत्तमरित्या कळते.

हत्ती

हत्ती आपल्या स्मरणशक्ती आणि पटकन शिकण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. हत्ती कित्येक वर्षांपर्यंत रस्ता आणि आपले मित्र लक्षात ठेवू शकतो.

घोडा

खूप वर्षांपर्यंत आपला मालक घोड्यांच्या लक्षात असतो. प्रामाणिक आणि विश्वासू प्राण्यांमध्ये घोड्याची गणना केली जाते.

ऑक्टोपस

ऑक्टोपस हा समुद्री प्राण्यांमधील सगळ्यात हुशार प्राणी मानला जातो. ऑक्टोपसची मती ही त्याच्या संपूर्ण शरीरात पसरलेली असते.

उंदीर

कोणत्याही परिस्थितील उंदीर अनुकलता प्राप्त करु शकतात. याच कारणामुळे वैज्ञानिक प्रयोगांसाठी सर्वात आधी उंदरांचा वापर केला जातो.

VIEW ALL

Read Next Story