आजकाल सगळेचं लोक स्मार्टफोन वापरत आहेत, पण त्यांना त्यांच्या फोनच्या सर्व वैशिष्ट्यांची माहिती नसते.
स्मार्टफोनमध्ये केवळ महत्त्वाचे डेटाच नाही, तर बँक अकाउंट्स, सोशल मीडिया पासवर्ड आणि इतर गोष्टीही सेव्ह होतात.
हॅकर्सपासून तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुमच्या अँड्रॉइड फोनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात हिरवा लाईट दिसत असेल, तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
याचा अर्थ असा आहे की, हॅकर्स तुमचा फोनमधून माईक किंवा कॅमेरा वापरत आहे.
हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमधील अॅप्स तपासून घ्यावे आणि संशयास्पद अॅप्स लगेच काढून टाकावे.
हिरवा लाईट दिसणे म्हणजेच, तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो.
नियमितपणे आपल्या स्मार्टफोनमधील अॅप्स आणि सेटिंग्ज तपासून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचा फोन सुरक्षित राहील.
स्मार्टफोन वापरताना सतर्कता राखणे आणि संशयास्पद अॅप्स डाउनलोड करणे टाळणे हे खूप महत्त्वाचे आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)