तुम्ही कित्येक लोकांना खडीसाखर आणि बडीशेप एकत्र करून खाताना पाहिले असेल. पण ते असे का बरं करत असतील?
बडीशेप आणि खडीसाखर दोघांना छान चव असते. तसेच यांना एकत्र करून खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
खडीसाखर आणि बडीशेप एकत्र करून खाल्ल्याने पाचनतंत्र सुधारते. त्याशिवाय पोटासंबंधी समस्या दूर होतात.
आजकाल अॅसिडिटीची समस्या खूप वाढत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी बडीशेप आणि खडीसाखरेचे मिश्रण फायदेशीर ठरते.
हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने शरीरातील पित्त कमी होते आणि पोटाला गार वाटते.
अनेकवेळा तोंडामध्ये दुर्गंध येत असतो, अशा वेळी बडीशेप आणि खडीसाखर मिसळून खावे.
एवढेच नाही तर रक्ताची कमतरता, खोकला, घश्यातील बॅक्टेरिया, थकवा अशा अनेक आजारांवर हे पदार्थ रामबाण उपाय आहेत.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)