स्मार्टफोनवर खूप सारे अॅप्स आणि ट्रिक्स आहेत, ज्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग केली जाऊ शकते. पण आपल्याला हे कळणार कसं?
समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर भविष्यात तुमच्या विरोधात त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. यामुळे तुमची इमेज बिघडू शकते.
अशा सोप्या ट्रीक जाणून घेऊया, ज्यामुळे कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करतंय की नाही? हे तुम्हाला समजू शकेल.
फोन कॉलच्या सुरुवातील सलग बीप असा आवाज आला तर कॉल रेकॉर्ड होत असतो.
कॉल सुरु असताना मध्येच बीप बीप असा आवाज येत असेल तर समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करतेय.
अनेकदा व्यक्ती फोन कॉल्सवर आपले सिक्रेट दुसऱ्यांशी शेअर करतात. समोरच्याने हे रेकॉर्ड केलं तर भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता.
गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत, जे कॉल रेकॉर्डिंगसाठी वापरले जातात. पण अनोळखी सोर्समधून अॅप इन्स्टॉल करु नका.
इंटरनेटवर सायबर फ्रॉड लोकांनी बनवलेलेदेखील खूप सारे अॅप्स आहेत. तुम्ही फोनमध्ये ते इंस्टॉल केल्यास तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो.