हिंदू धर्मात चंद्राला देवी- देवतांप्रमाणे पुजले जाते.
भगवान शंकराच्या डोक्यावर सुशोभित असलेला अर्धचंद्र तसेच संकष्टी चतुर्थीला केल्या जाणाऱ्या चंद्राच्या पुजेचं विशेष महात्म्य आहे.
इतकेच नाही, तर आपल्या देशात चंद्राला 'मामा' असं संबोधलं जातं. मात्र, चंद्राला मामा असं का म्हणतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोके वर काढत असेल. तर जाणून घेऊया याचं उत्तर.
खरंतर, ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी समुद्रातून अनेक तत्त्वं बाहेर पडली होती. यामध्ये माता लक्ष्मी आणि चंद्राचा समावेश होता.
चंद्र हा माता लक्ष्मीचा लहान भाऊ असल्याचं मानलं जातं. माता लक्ष्मीचा लहान भाऊ असल्याकारणाने चंद्राला मामा असं म्हणतात.
तसेच, चंद्र पृथ्वीभोवती चारही बाजूंनी फिरत असतो. म्हणजेच पृथ्वीचं एका भावाप्रमाणे रक्षण करतो.
पृथ्वीला आपण माता म्हणतो आणि सदैव पृथ्वीसोबत असल्याकारणाने चंद्राला मामा म्हटले जाते.