विकी कौशलचा 'छावा' चित्रपट दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.
'छावा' चित्रपटाच्या आधी विकी कौशलने 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने 246 कोटींची कमाई केली होती.
विकी कौशलचा 'राझी' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने 123 कोटींची कमाई केली होती.
या यादीत विकीच्या 'सॅम बहादुर' चित्रपटाचा देखील समावेश आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 92.98 कोटी रुपयांची कमाई केली होती.
विकीने सारा अली खानसोबत 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाने 88 कोटींची कमाई केली होती.
यामध्ये 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा देखील समावेश आहे. या चित्रपटाने 66.28 कोटी रुपयांची कमाई केली होती.