भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला टीममधून बाहेरचा रस्ता!

Hardik Pandya not include Playing 11 : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये वनडे सिरीज सुरु असून तिसरा सामना केरळमध्ये खेळवला जातोय. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान आजच्या सामन्यात हिटमॅनने टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नुकतंच हार्दिक पंड्याला टी-20 फॉर्मेटचं उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. हार्दिकला टीमबाहेर ठेवल्यानंतर चाहत्यांना मात्र ही गोष्ट फार आवडली आहे. 

टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआय यांनी तिसऱ्या सामन्यासाठी घेतलेला हा निर्णय चाहत्यांना खूपच आवडला आहे. यावरून चाहते सोशल मीडियावर पंड्याची खिल्ली उडवताना दिसत असून विविध प्रतिक्रिया देखील देण्यात आल्या आहेत. 

हार्दिकला टीममध्ये नाही मिळाली जागा

वनडे सिरीजचा शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरली होती. या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटने संघात काही बदल केले. यामध्ये टीमचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याच्या जागी टीममध्ये स्पिनर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. गेल्या 2 सामन्यांमध्ये हार्दिक विचित्र घटना करताना कैद झाला होताय

पहिल्या सामन्यामध्ये हार्दिक कोहलीसोबत दादागिरी करताना दिसला होता, तर दुसऱ्या सामन्यात डग आऊटमध्ये बसलेल्या खेळाडूंना शिवीगाळ केली होती. चाहत्यांना त्याचं हे कृत्य अजिबात आवडलेलं नव्हतं. त्यामुळे त्याला प्लेईंग 11 मधून बाहेर काढल्यानंतर चाहत्यांना आनंद झाला आहे.

हार्दिक पांड्याने केली शिवीगाळ

कोलकात्याच्या इडन गार्डनवर भारत आणि श्रीलंकादरम्यान दुसरा एकदिवसीय (India vs Sri Lanka 2nd ODI) सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाची पहिली गोलंदाजी होती. सामन्याच्या दहाव्या षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) चेंडू हार्दिक पांड्याच्या हाती सोपवला. याचदरम्यान हार्दिक पांड्याने एक मोठी चूक केली. हार्दिक पांड्याने डग आऊटमध्ये बसलेल्या ज्युनिअर खेळाडूकडे पाणी मागितलंहोतं. पण ते न आल्याने हार्दिक संतपला, यावेळी कॅमेरासमोर शिवीगाळ करताना तो दिसतोय. आधीच्या षटकात पाणी मागितलं होतं, अजून आलं नाही, "तिथे बसून  काय XXX आहात' असे अपशब्द त्याने वापरले.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
The one who abuses others will himself drink water fans were happy seeing Hardik Pandya out of playing XI
News Source: 
Home Title: 

भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला टीममधून बाहेरचा रस्ता!

भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला टीममधून बाहेरचा रस्ता!
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
भोगा आपल्या कर्माची फळं...; शिवीगाळ आणि दादागिरीनंतर Hardik Pandya ला बाहेरचा रस्ता
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, January 15, 2023 - 17:30
Request Count: 
1
Is Breaking News: 
No