IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

मुंबई :  आयपीएल 2022 च्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा 10 संघ आणि 70 सामने असा आयपीएलचा नवा फॉरमॅट असणार आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. मुंबईतील ब्रेबॉन, वानखेडे आणि डी वाय पाटील स्टेडियमवर 55 सामने तर पुण्यातील MCA स्डेडियमवर 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. कोणत्या टीम कोणत्या आलिशान हॉटेल्समध्ये राहणार तिथे कशा सोयीसुविधा असणार हे आज जाणून घेऊया.

मुंबई
आयपीएलमधील सर्वात यशस्वी सर्वात जास्त वेळा ट्रॉफी मिळवणारा संघ मुंबई इंडियन्स आहे. मुंबई संघ बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार आहे. मुंबई विमानतळापासून 5 किमी अंतरावर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये इटालियनपासून जपानी पद्धतीच्या वेगवेळ्या डिश उपलब्ध आहेत. या हॉटेलमध्ये स्पा आणि फिटनेस सेंटर देखील आहे. 

चेन्नई
चेन्नई संघ देखील ट्रायडंट हॉटेलमध्ये राहणार आहे. ट्रायडंट 5 स्टार हॉटेलमध्ये या टीमची आलिशान व्यवस्था करण्यात आली आहे. वानखेडे स्टे़डियमपासून 3 किमी अंतरावर ही टीम राहणार आहे. 

बंगळुरू
बंगळुरू संघ Taj Lands End, Mumbai हॉटेलमध्ये राहणार आहेत. हे हॉटेल वांद्र्यामध्ये आहेत. समुद्रापासून 200 मीटर दूर अंतरावर हे हॉटेल आहे. या हॉटेलमधून वरळी सी लिंकचा सुंदर नजारा खेळाडूंना दिसणार आहे. या हॉटेलमध्ये स्पा आणि फिटनेस सेंटर दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. 

हैदराबाद
आयटीसी मराठा हॉटेलमध्ये हैदराबाद संघ राहणार आहे. हे हॉटेल अंधेरी ईस्ट भागात आहे. इथून विमानतळ खूप जवळ आहे. या हॉटेलमध्ये मसाज टेअर-टेबलसारख्या सुविधा असणार आहेत. 

पंजाब
पंजाब संघ रेनेसां हॉटेलमध्ये राहणार आहे. मुंबई विमानतळापासून हा केवळ 7 किती दूर आहे. या हॉटेलमध्ये जिम, स्पा, स्विमिंग पूल सारख्या सुविधा आहेत. 

राजस्थान
राजस्थान संघ ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये राहणार आहे. शॉम्पिंग प्लाझा, फिटनेस सेंटर सारख्या खास सुविधा या हॉटेलमध्ये देण्यात आल्या आहेत. 

लखनऊ 
ताज विवांता हॉटेलमध्ये राहणार आहे. परेड रोडजवळ हे हॉटेल असल्याची माहिती मिळाली आहे. स्विमिंग पूल, एक फिटनेस सेंटर, एक स्पाची सुविधा उपलब्ध आहे. 

दिल्ली
दिल्ली संघ ताज पॅलेसमध्ये राहणार आहे. हे हॉटेल कुलाबा इथे आहे. 'गेटवे ऑफ इंडिया' जवळ असणार आहे. वानखेडे स्टेडियमपासून हे हॉटेल जवळ आहे. 

गुजरात
गुजरात संघाची टीम जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये राहणार आहे. हे हॉटेल जूहू परिसरात आहे. संजय गांधी नॅशनल पार्क आणि गोरेगाव फिल्म सिटीजवळ आहे. 

कोलकाता
परेल इथल्या आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलमध्ये राहणार आहे. स्पा, इनडोर पूल, फिटनेस सेंटर सारख्या सुखसोई कोलकाता संघासाठी असणार आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
IPL 2022 Team 10 Hotels MS Dhoni Virat Kohli Mumbai Indians RCB Lucknow
News Source: 
Home Title: 

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा

IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
IPL 2022 : या 10 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार क्रिकेटपटू, कशी असणार सुविधा पाहा
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, March 14, 2022 - 12:12
Request Count: 
1
Is Breaking News: 
No