भारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. गॉल इंटरनेशनल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये पहिला इंनिगमध्ये भारताकडे ३०९ रनची आघाडी होती. दूसऱ्या इनिंगमध्ये भारताने आणखी २४० रन्स जोडत श्रीलंकेसमोर ५५० रन्सचं टार्गेट ठेवलं.
श्रीलंकेची टीम २४५ रनवर ऑलआऊट झाली. भारताने श्रीलंकेवर पहिल्या टेस्टमध्ये ३०४ रनने मात करत विजय मिळवला. दूसऱ्या इनिंगमध्ये अश्विन आणि जडेजाने 3-3 विकेट घेतले. कर्णधार विराट कोहलीने १०३ आणि अजिंक्य रहाणेने 23 रन करत नाबाद परतले आणि डाव घोषित केला.
पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेची टीम २९१ रनवर ऑलआऊट झाली होती. भारताने पहिल्या इनिंगमध्ये ६०० रन केले होते. श्रीलंकेला फॉलोऑन वाचवण्यासाठी ४०१ रन हवे होतो पण १९१ वर संपूर्ण टीम ऑलआऊट झाली.
कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेला फॉलोऑन नाही दिलं. भारताने पुन्हा बँटींग करत मोठी आघाडी घेतली. श्रीलंकेकडून दिलरुवान परेराने ९२ तर एंजेलो मॅथ्यूजने ८३ रन केले. पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून रवींद्र जडेजाने ३ विकेट घेतले. शमीने २ आणि यादव, अश्विन आणि पंड्या को १-१ विकेट घेतले.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
India win by 304 runs on sri lanka
News Source:
Home Title:
भारताचा श्रीलंकेवर ३०४ रन्सने 'विराट' विजय

Yes
No
Facebook Instant Article:
Yes