India vs scotland : भारतासाठी आज महत्त्वाचा सामना, उपान्त्य फेरी गाठण्यासाठी असं असणार समीकरण

T20 World Cup : टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला (Team India) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दोन महत्त्वाचे सामने आहेत. या दोन्ही सामन्यांवर भारतीय संघाचं उपान्त्य फेरीतील भवितव्य अवलंबून असणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या (Afghanistan) पहिल्या विजयानंतर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. 

आता भवितव्य रनरेटवर

आज पहिला सामना न्यूझीलंड (New Zealand) आणि नामिबिया (Namibia) यांच्यात होणार आहे. या सामन्यात नामिबिया किवी संघाला कडवी टक्कर देईल, आणि हा सामना जिंकला नाही तरी कमीत कमी फरकाने हरेल, अशी आशा भारताला असेल. असं झाल्यास न्यूझीलंडचा नेट रेट रेट वाढणार नाही. दुसरा सामना भारत (India) आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यात होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला मोठा फरकाने विजय मिळवून आपला रनरेट (Net Run Rate) वाढवायचा आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला 66 धावांनी हरवलं. पण या नंतरचे दोनही सामने टीम इंडिया इतक्याच मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. इतकंच नाही तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणीस्तानच्या पराभवाची प्रार्थनाही करावी लागणार आहे. त्यातल्या त्यात टीम इंडियासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत केलं नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या रन रेटमध्ये फारसा फरक पडलेला नाही. 

आता भारताच्या गटातले दोनही सामने स्कॉटलंड आणि नामीबिया सारख्या दुबळ्या संघांविरुद्ध आहे. पण भारताला समीकरणांवर अवलंबून राहावं लागणार आहे.

असं असेल समीकरण

1. भारताने स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत केले आणि रविवारी न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यास भारत उपांत्य फेरीत पोहोचू शकेल. या स्थितीत भारत, अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी सहा गुण असतील, पण चांगल्या नेट रनरेटमुळे भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. सध्या भारताचा रन रेट +0.073, न्यूझीलंडचा रन रेट +0.816 आणि अफगाणिस्तानचा रन रेट +1.481 आहे.

2. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव केल्यास भारतासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे बंद होतील आणि न्यूझीलंड आपले दोन्ही सामने जिंकून आठ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल. या प्रकरणात रन रेटवर देखील कोणताही परिणाम होणार नाही. भारताचे सहा आणि अफगाणिस्तानचे चार गुण असतील. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडतील.

3. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. या स्थितीतही भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे सहा गुण असतील, मात्र चांगल्या धावगतीच्या आधारावर अफगाण संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.  पाकिस्तान क्रिकेट संघाने याआधीच उपान्त्य फेरी गाठली आहे.

भारतीय संघाचं शेड्यूल्ड

भारताचा आज स्कॉटलंडशी सामना आहे, त्यानंतर ८ नोव्हेंबरला नामिबियाशी भिडणार आहे. भारताला उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर हे सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. भारताने पहिली फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या उभारावी लागले, आणि विरोधी संघाला कमीतकमी धावसंख्येत रोखावं लागेल. किंवा लक्षाचा पाठलाग करताना भारताला कमीत कमी विकेट्स गमावून मोठा विजय मिळवाला लागेल.

उपान्त्य फेरीत पोहचल्यास कोणाविरुद्ध सामना?

भारतीय संघ उपान्त्य फेरीत पोहचलाच तर गटात दुसऱ्या स्थानावर राहिल आणि उपान्त्य फेरीत गट ए मधील अव्वल स्थानावर असलेल्या संघाशी मुकाबला करावा लागेल. गट ए मध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार आहे. इंग्लंडने आतापर्यंतचे चारही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
india vs scotland match semifinal know what indians have to do now?
Home Title: 

India vs scotland : भारतासाठी आज महत्त्वाचा सामना, उपान्त्य फेरी गाठण्यासाठी असं असणार समीकरण

India vs scotland : भारतासाठी आज महत्त्वाचा सामना, उपान्त्य फेरी गाठण्यासाठी असं असणार समीकरण
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
India vs scotland : भारतासाठी आज महत्त्वाचा सामना
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, November 5, 2021 - 15:19
Created By: 
Rajiv Kasle
Updated By: 
Rajiv Kasle
Published By: 
Rajiv Kasle
Request Count: 
1
Is Breaking News: 
No