Arjun tendulkar च्या कथित एक्स गर्लफ्रेंड Danielle Wyatt चा साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो Viral

Danielle Wyatt Engagement: इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची दिग्गज खेळाडू डॅनिएल व्याट (Danielle Wyatt) हिने मोठी घोषणा केली आहे. 2 मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने साखरपुडा केल्याची सांगितलं आहे. डॅनियलने तिची पार्टनर जॉर्जी हॉजसोबत एक जबरदस्त फोटो शेअर केलाय. 

डॅनियलने समलिंगी संबंधांवरून पडदा हटवून त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केलीये. कधी एकेकाळी डॅनियलचं नाव माजी भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसोबतही जोडलं जातं होतं. या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र त्यावर अधिकृतरित्या काहीही माहिती नव्हती.

डॅनियल वॅट (Danielle Wyatt Engagement) ने शेअर केली पोस्ट

डॅनियल वॅट (Danni Wyatt) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत साखरपुड्याची माहिती दिलीये. या पोस्टमध्ये डॅनीने पार्टनर जॉर्जी हॉज हिच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. दोघींचा किस्स करतानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत डॅनीच्या पार्टनरच्या हातात अंगठी दिसतेय. ही पोस्ट शेअर करत डॅनीने “माईन फोरेव्हर” असं म्हटलं आहे. 

डॅनियलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

डॅनिने मार्च 2010 साली भारतीय महिलांविरुद्ध वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-20 पदार्पण केलेलं. तिने इंग्लंडकडून 102 वनडे सामने आणि 143 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेत. वनडेमध्ये तिने 23.68 च्या सरासरीने 1776 रन्स केलेत. यामध्ये 2 शतकांचाही समावेश आहे. 

याशिवाय टी-20 मध्ये तिने 21.53च्या सरासरीने 2369 रन्स केलेत. यामध्येही 2 शतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजीत तिने वनडेत 27 विकेट्स आणि टी-20मध्ये 46 विकेट्स घेतल्यात.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Arjun Tendulkar ex girlfriend got engaged to a female player pictures created panic on the internet
News Source: 
Home Title: 

Arjun tendulkar च्या कथित एक्स गर्लफ्रेंडचा साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून दिली माहिती

Arjun tendulkar च्या कथित एक्स गर्लफ्रेंड Danielle Wyatt चा साखरपुडा; सोशल मीडियावर फोटो Viral
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Arjun tendulkar च्या कथित एक्स गर्लफ्रेंडचा साखरपुडा; फोटो पोस्ट करून दिली माहिती
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, March 2, 2023 - 22:57
Updated By: 
Manoj Kadam
Request Count: 
1
Is Breaking News: 
No