एसटीत भरणार २००० चालकांची पदे

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे.
एस.टी.मध्ये चालकांची कमतरता असल्याने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभागात दैनंदिन गाड्या चालवतानाही महामंडळाची तारांबळ होत आहे. चालक-वाहक कमी असल्याने बऱ्याचवेळा गाड्या रद्द करव्यात लागतात. त्यामुळे प्रवाशांचा रोष एस.टी. प्रशासनाला घ्यावा लागत आहे. त्यामुळे ही भरती दिलासादायक ठरणार आहे. तसेच कोकण विभागासाठी स्वतंत्र भरती असल्याने कोकणातील तरूणांसाठी ही खूशखबर आहे.
नुकत्याच झालेल्या भरतीत कोकण विभागातून एस.टी.ला केवळ ६८४ चालक मिळाले होते. तर चालकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आधीच कमी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भर पडत आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई विभागात दैनंदिन गाड्या चालवताना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वधभूमीवर एस.टी.ने कोकणासाठी दोन हजार चालकांची भरती करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. याबाबची माहिती एस.टी. कामगार विभागाचे उपमहाव्यवस्थापक ए. एल. परब यांनी दिलेय.

दरम्यान, या आधीच्या भरती प्रक्रियेत एमकेसीएलकडून अनेक त्रुटी करण्यात आल्या होत्या. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना जास्तीत जास्त वेळ संगणकावर काम करावे लागत होते. अर्जातही अनेक चुका आढळल्याने भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्याची दखल घेत एस.टी.ने भरती प्रक्रियेसाठी नव्याने इजन्सीचा शोध सुरू केला आहे. तसे अर्ज मागवले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
konkan Regional ST Recruitment
Home Title: 

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

No
164093
No
Authored By: 
Surendra Gangan