अश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी

इंदूर : टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग जसा मैदानात फटकेबाजी करायचा तशी जबरदस्त फटकेबाजी तो गेल्या दिवसांपासून ट्विटरवर करत आहे.  त्यांच्या या मजेशीर ट्विटचे बिग बी देखील चाहते आहेत.  यावेळी सेहवागने आपला मोर्चा ‘मॅन ऑफ द सीरिज’ ठरलेल्या आर. अश्विनकडे वळविला. 

सेहवागने अश्विनवर असं काही ट्विट केलं की त्यावर अश्विन, त्याची बायको आणि सेहवागची बायको या सर्वांनी दाद दिली आणि त्यावर प्रतिक्रियाही दिली. 

 

इंदूर कसोटीत दोन्ही डावात मिळून आर. अश्विनने न्यूझीलंडचे १३ गडी बाद केले. तर तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण २७ विकेट घेतल्या. त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द सीरीज मान मिळाला. मग वीरूने त्याचं अभिनंदन ट्विटरवरून खास शैलीत केले. 

‘सातव्यांदा मॅन ऑफ द सीरिजसाठी आर. अश्विनचे अभिनंदन, “केवळ लग्न झालेल्या पुरुषालाच घरी लवकर जाण्याचं महत्त्व समजू शकतं. #FamilyTime

सेहवागच्या या गंमतीशीर ट्वीटवर आर. अश्विनची पत्नी प्रीती आणि सेहवागची पत्नी आरतीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
virender-sehwag-funny- twit-on-r-ashwin
News Source: 
Home Title: 

अश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी

अश्विनच्या यशावर सेहवागची ट्विटवर गंमतशीर फटकेबाजी
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes