पत्रकाराच्या प्रश्नावर रैनाचे अजब उत्तर

मुंबई : यंदाच्या आयपीएल हंगामात भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाकडे गुजरात लायन्सचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सीएसके संघावर बंदी घालण्यात आल्यानंतर गुजरातच्या संघाने रैनाला खरेदी केले.

या आयपीएलमध्ये रैनाकडे संघाचा कर्णधार म्हणून मोठी जबाबदारी असणार आहे. या नव्या कर्णधाराने आयपीएलसंदर्भात झालेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान एक अजबंच विधान केलं. 

एका पत्रकाराने त्याला विचारल की तु भारतीय संघाचा सदस्य आहेस त्यामुळे इंडियन कोचसोबत तु अधिक कम्फर्टेबल असतोस की फॉरेन. या प्रश्नावर उत्तर देताना रैना म्हणाला, तुम्ही तुमच्या बायकोसोबत कम्फर्टेबल असता की दुसऱीबरोबर?. या उत्तराने तेथे उपस्थित सर्वच गोंधळले. तसेच कोचबाबतचा निर्णय बीसीसीआय घेते. त्यामुळे नियुक्ती केलेल्या कोचसोबत आम्ही प्रॅक्टिस करतो, असे पुढे रैना म्हणाला. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
raina give irrelevant answer in press conference
News Source: 
Home Title: 

पत्रकाराच्या प्रश्नावर रैनाचे अजब उत्तर

पत्रकाराच्या प्रश्नावर रैनाचे अजब उत्तर
Yes
No