द. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
इंदूर : इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.
'कॅचेस विन मॅचेस' ही म्हण आज टीम इंडियासाठी खरी ठरलीय. कारण आजच्या विजयासाठी विनिंग कॅचेस महत्त्वाच्या ठरल्या.
आणखी वाचा - Live स्कोअरकार्ड : भारत vs दक्षिण आफ्रिका दुसरी वन-डे
भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मात्र कॅप्टन कूल धोनीच्या नॉटआऊट ९२ रन्समुळे भारतानं २४७ रन्स केले. धोनीला 'मॅन ऑफ द मॅच'चा खिताब मिळाला.
अवघ्या २४८ रन्सचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम मैदानात उतरली. पण आज भारतीय बॉलर्सने कमाल केली. चांगली बॉलिंग आणि जबरदस्त फिल्डिंगमुळे भारताला मॅच जिंकण्यात यश आलं. अखेरच्या क्षणापर्यंत मॅचमधील उत्सुकता कायम होती.
भुनेश्वर कुमार आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. भज्जीनं २ तर उमेश यादव आणि मोहित शर्माला एक विकेट मिळाली.
आणखी वाचा - टी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
द. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
